चाळीसगावजवळ भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

45

भरत काळे, जळगाव

चाळीसगावजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यातील ६ जण हे एकाच कुटुंबातील आहेत. या अपघातामध्ये २ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर धुळ्यातील सिद्धीविनायक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटे ३ वाजता राष्ट्रीय महामार्ग २११ वर ही दुर्घटना घडली.

अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेले सर्वजण हे बोढरे गावातील रहिवासी होते. त्यामुळे या गावावर शोककळा पसरली आहे. राजेंद्र चव्हाण, नामदेव चव्हाण, सीताबाई चव्हाण, नितेश चव्हाण, मिथुन चव्हाण, शुभम चव्हाण अशी मृतांची नावं आहेत.पंडीत राठोड या गाडी चालकाचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. एका रुग्णाला चव्हाण कुटुंब टाटा मॅजिक गाडीने चाळीसगावला निघाले होते. त्यांच्या गाडीला समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने जीवघेणी धडक दिली ज्यात ७ जणांचा मृत्यू झाला. चव्हाण कुटुंब ज्या गाडीतून जात होतं, त्या गाडीच्या मागून दोघेजण दुचाकीवरून जात होते. ते चव्हाण कुटुंबियांच्या गाडीवर आदळल्यान गंभीर जखमी झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या