इमारतीत बांधकामाच्या ठिकाणी मातीचा ढिगारा अंगावर कोसळल्याने सात मजुरांचा दबून मृत्यू झाल्याची घटना गुजरतमधील मेहसाना जिल्ह्यात घडली. आणखी काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळावर बचाव कार्य सुरू आहे.
मेहसाना येथे एका इमारतीत एका खासगी कंपनीमार्फत भूमिगत टँकच्या खड्डा खोदण्याचे काम सुरू होते. यावेळी मातीचा ढिगारा मजुरांच्या अंगावर कोसळल्याने दुर्घटना घडली. जेसीबीच्या सहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत सात मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आणखी काही मजुर ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.