सातवा वेतन आयोग, कमी पावसामुळे महागाई भडकणार रिझर्व्ह बँकेचा इशारा

41

सामना ऑनलाईन,मुंबई

सातवा वेतन आयोग, जीएसटीची अंमलबजावणी आणि एल-निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा पाऊस कमी पडण्याची शक्यता या कारणांमुळे महागाई वाढण्याची भीती रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने आज द्वैमासिक पतधोरण जाहीर केले. त्यात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवल्यामुळे गृह कर्जासह इतर कर्जदारांना दिलासा मिळालेला नाही.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी सलग तिसऱया पतधोरणात व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. नोटाबंदीनंतरही रेपो रेट ६.२५ टक्के कायम ठेवल्यामुळे कर्जावरील व्याजदर कमी झालेले नाहीत. मात्र या पतधोरणात रिव्हर्स रेपो रेटमध्ये (रिझर्व्ह बँकेच्या दराने अन्य बँकांकडून पैसे घेते तो दर. रिव्हर्स रेपो रेट वाढल्यास बँकांना फायदा होतो. पण बाजारात पैशांचा पुरवठा कमी होतो. ग्राहकांना फायदा होत नाही.) ०.२५ टक्क्यांनी वाढ करून हा दर ६.५ टक्के केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या