जम्मू-कश्मीर, लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

305

जम्मू-कश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे दिवाळी गिफ्ट मिळाले आहे.  केंद्र सरकारने या दोन्ही ठिकाणच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींनुसार मिळणारे सर्व भत्ते लागू करण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी दिली. या सर्व भत्त्यांचा लाभ 31 ऑक्टोबर 2019 पासून मिळेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक आदेश जारी केलेत. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट रोजी जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जम्मू-कश्मीरचे विभाजन होऊन जम्मू-कश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार झाले.

आपली प्रतिक्रिया द्या