बिल क्लिंटन यांचे आणखी एक अफेयर, जेफ्री यांच्या जीवनावरील पुस्तकात खळबळजनक दावा

1047

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन पुन्हा एकदा प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. मोनिका लेविंस्की यांच्या व्यतिरिक्त क्लिंटन यांचे आणखी एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. घिसलाईन मॅक्सवेल असे या महिलेचे नाव असून अमेरिकेचे फायनान्सर जेफ्री एपस्टीप यांच्यासाठी तिने मुलींची खरेदीही केली होती असा खळबळजनक दावा एका पुस्तकातून करण्यात आला आहे.

‘अ कन्विनिअंट डेथ- द मिस्ट्रीयस डिमाईस ऑफ जेफ्री एपस्टीन’ हे पुस्तक जेफरी एपस्टीन यांच्या जीवनावर आधारित आहे. अॅलेन गुडमन आणि डॅनियल हार्पर या पुस्तकाचे लेखक आहेत. जेफरी एपस्टीन हे अमेरिकेतील प्रख्यात फायनान्सर होते. त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप होते. त्यांनी 2019 साली आत्महत्या केली होती. या पुस्तकातून बिल क्लिंटन आणि जेफ्री एपस्टीन यांच्या संबंधांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. दोघांची भेट परदेश दौर्‍यात एपस्टीन यांच्या खासगी जेटमध्ये झाली होती. एपस्टीनसोबत चार वेळा विमान प्रवास केल्याची कबुली स्वतः क्लिंटन यांनी दिलेली आहे. या प्रवासात घिसलाईन मॅक्सवेल यांच्या सोबत असायची. मॅक्सवेलच्या मॅनहॅटन येथील घरी क्लिंटन अनेकदा गेलेले आहेत. जुलै 2010 मध्ये न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या चेल्सी क्लिंटन यांच्या विवाह सोहळ्यासाठी निमंत्रित केलेल्या मोजक्या पाहुण्यांमध्ये मॅक्सवेल हीदेखील होती असा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. मात्र क्लिंटन यांनी मॅक्सवेल सोबतच्या कथित संबंधांचा दावा फेटाळून लावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या