घर भाड्याने हवंय, शरीरसुख द्या, विकृत घरमालकांची मागणी

सामना ऑनलाईन, ब्रिस्टॉल

बीबीसीने केलेल्या एका स्टींग ऑपरेशनमुळे जबरदस्त खळबळ उडाली आहे. भाड्याने घर शोधणाऱ्या महिलांना काही घर मालक फुकटात राहण्याची मुभा देतायत अट एवढीच आहे की आठवड्यातून एकदा शैय्यासोबत करायची. असे बरेच विकृत घरमालक या स्टींग ऑपरेशनमुळे उघडकीस आले आहेत.

बीबीसीच्या अंडरकव्हर रिपोर्टरने माईक नावाच्या एका घरमालकाशी त्याच्या घरी जाऊन संपर्क साधला होता. माईकने या महिला पत्रकाराला सांगितलं की त्याच्याकडे २ बेडरूमचा एक फ्लॅट आहे, तो तिला फुकटात वापरायला मिळू शकतो अट एवढीच आहे की जर ती त्याच्यासोबत शैय्यासोबत तयार असेल तर. जोपर्यंत ती यासाठी तयार असेल तोपर्यंत तिला एक पैसाही भाडं न देता या घरात राहता येऊ शकेल असंही माईकने तिला सांगितले. माईकप्रमाणेच एका ६० वर्षांच्या म्हाताऱ्यानेही या महिला पत्रकाराला शैय्यासोबतीच्या बदल्यात घर फुकटात वापरायला देण्याचं आमीष दाखवलं. घरासोबतच या महिला पत्रकाला त्याने वायफाय, वीज, गॅसही मोफत देण्याचं आश्वासन दिलं होतं. लंडनमध्ये आता घरमालकांनी पेपरमध्ये घर भाड्याने द्यायचे आहे, यासाठी दिलेल्या जाहिरातींमध्येही उघडपणे शरीरसुखाच्या बदल्यात घर भाड्याने देण्याची तयारी असल्याचं सांगायला सुरूवात केली आहे.