सेक्स क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाकडून उकळले 50 हजार

3096

तरूणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याची सेक्स क्लिप तयार करून ती व्हायरल करण्याची धमकी देत सहा जणांच्या टोळीने तरूणाला पाच लाखाच्या खंडणीची मागणी केली. 50 हजार रुपयेही तरूणाकडून उकळण्यात आले. दरम्यान, तरूणाने पोलिसात धाव घेत दिलेल्या तक्रारीवरून सहा जणांविरोधात पेठ बीड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.

हा 29 वर्षांचा तरुण बीड येथील गेवराई तालुक्यात राहतो. त्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. यातून दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. 24 जानेवारी रोजी दोघे खंडेश्वरी मंदिर परिसरातील एका खोलीत असताना दोघांमधील खासगी क्षणांची व्हिडिओ क्लिप त्या तरुणीच्या साथीदारांनी तयार केली. यानंतर तरुणाकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी करून ब्लॅकमेल करण्यात आले.

तरूणाने घाबरून 50 हजार रूपये तात्काळ दिले मात्र. या टोळीकडून पाच लाख दे अन्यथा क्लिप व्हायरल करू अशी धमकी मिळाल्याने तरूणाने पेठ बीड पोलीस ठाणे गाठले. तरुणाच्या तक्रारीवरून विठ्ठल जाधव (रा.लोळदगाव, ता.गेवराई), संतोष चांगण (रा.बीड) यांच्यासह तीन पुरूष (पूर्ण नावे माहीत नाहीत) व अन्य एक अनोळखी महिला अशा सहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पो.नि.संतोष भारती हे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या