सेक्स पवित्र आहे असं म्हणणाऱ्या केरळमधील चर्चच्या मासिकातील लेखामुळे खळबळ

302

सामना ऑनलाईन। कोची

केरळमधील एका चर्चने प्रकाशित केलेल्या मासिकातील लेखावरून वाद निर्माण झाला आहे. सेक्स व कामुकतेला प्रोत्साहन देणारा हा लेख असून यात सेक्स पवित्र असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच सेक्स व शरीर हा मनाचा उत्सव आहे. यामुळे शरीरसंबंधांशिवाय प्रेम म्हणजे फटाक्यांशिवाय सण साजरा करण्यासारखे आहे असे या लेखात म्हटले आहे. ‘मुखरेखा’ असे या मासिकाचे नाव असून सेक्स व आयुर्वैद या विषयावरचा हा लेख आहे. डॉक्टर संतोष थॉमस यांनी तो लिहला आहे.
आलप्पुझा बिशप चर्चचे हे मासिक आहे. फादर झेवियर कुड्यामेश्रे हे या मासिकाचे संपादक आहेत. मासिकात पहिल्यांदाच कामशास्त्राशी संबंधित लेख लिहण्यात आल्याचे कुड्यामेश्रे यांनी म्हटले आहे. तसेच हा लेख आरोग्याशी संबंधित असून त्याचे लेखक डॉक्टर आहेत व त्यांनी या विषयावर अनेक लेखही लिहले असल्याचे कुड्यामेश्रे यांनी सांगितले आहे.
दरम्यान सामान्य श्रध्दाळूंना भक्तीचा मार्ग स्वीकारणाऱ्या भक्तांच्या मनात सेक्सबद्दल आसक्ती नसणे अपेक्षित असते. पण या मासिकात सेक्सलाच प्रोत्साहन देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या