नगरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पाच पुरुषांसह महिला ताब्यात

164


सामना प्रतिनिधी । नगर

नगर शहरामध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. तोफखाना पोलिसांनी तपोवन रोडवरील घरावर छापा टाकून पाच पुरुष, एका महिलेस ताब्यात घेतले आहे, तर एकीची सुटका करण्यात आली. अर्जुन भुजबळ, संतोष भुजबळ, समीर शेख, कैलास क्षिरसागर, अक्षय दरंदले ही अटक केलेल्यांची नावे आहेत. या कारवाईमुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील तपोवन भागात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, महिला पोलीस उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे, पोलीस कर्मचारी विश्वास गाजरे, तरटे, शाईन पठाण आदींच्या पथकाने तपोवन रोड भागातील श्रावणी कॉलनी येथील एका घरावर छापा टाकला. तेथे काही महिला व पुरुष आढळून आल्या. पोलिसांनी पाच पुरुष व एका महिला एजंटलाा ताब्यात घेतले आहे, तर एका पीडितेची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या