इंटिरियर डिझायनिंगच्या नावाखाली सुरू होते व्हर्च्युअल सेक्स रॅकेट; अंगप्रदर्शनाचे द्यायचे प्रशिक्षण

इंटिरियर डिझायनिंगच्या नावाखाली सुरू असलेले वर्चुअल सेक्स रॅकेट गुजरात पोलिसांनी उघडकीस आणले आहे. रे-डिझाइन वर्ल्डच्या नावाने सुरू असलेल्या इंटेरियर डिझायनिंगच्या कंपनीत व्हर्च्युअल सेक्स रॅकेटचा धंदा सुरू होता. या टोळीकडून तरुणींना अंगप्रदर्शनाचे प्रशिक्षणही देण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

रे- डिझाइनच्या नावाखाली सुरु असलेल्या या वर्चुअल सेक्स रॅकेटचा मास्टरमाइंड निलेश गुप्ताला वडोदरा पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याची साथीदार अमी परमार फरार झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून हे व्हर्च्युअल सेक्स रॅकेट सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. विविध राज्यातील गरजू मुलींचा शोध घेऊन त्यांना पैशाचे प्रलोभन दाखवण्यात येत होते. त्या जाळ्यात अडकल्यानंतर त्यांना पॉर्न वेबासाइटवर अंगप्रदर्शनाचे प्रशिक्षणही देण्यात येत होते.

हा वर्चुअल सेक्स रॅकेटचा धंदा निलेश गुप्ताच्या रशियन पत्नीच्या अंकाऊवरून सुरु होता. त्यासाठी बिटकॉइनद्वारे पैशांची देवाण-घेवाण करण्यात येत होती.  पोलिसांनी त्यांच्याकडून 30 बिटकॉइन वॉलेट आणि सव्वा कोटी रुपयांचे सुमारे 9.45 बिटकॉइन जप्त केले आहेत. त्याचसोबत लॅपटॉप,वेबकॅमही जप्त करण्यात आले आहे.

या सेक्स रॅकेटमध्ये आणखी काहीजणांची समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच याची व्यापी मोठी असण्याची  शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. निलेश गुप्ताची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच त्याची फरार साथीदार अमीचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या