मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

16
सामना ऑनलाईन । नागपूर
प्रादेशिक मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्याने उपचार घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर मुलीने हा धक्कादायक प्रकार सांगितला. याप्रकरणी मानकापूर पोलीस चौकशी करीत आहेत.
शहरातील एका अनाथालयात वास्तव्यास असलेली १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी मानसिक आजारी होती. चार ते पाच महिन्यांपूर्वी उपचारासाठी तिला प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले.  काही दिवसातच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर अनाथालयात पोहचल्यानंतर उपचारादरम्यान मनोरुग्णालयातील एका ३४ वयोगटातील परिचराने आपल्यावर अत्याचार केल्याच खुलासा केला. ही धक्कादायक माहिती मिळताच संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी मानकापूर पोलीस ठाणे गाठले.
पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी रात्रीच मनोरुग्णालयात धाव घेतली. पीडित मुलीचा पोलिसांनी जबाब घेऊन गुन्हा नोंदवून घेतला आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या