भाकरवाडी येथील निवासी अंध विद्यालयात विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

33
१७ एप्रिल १२ वर्षाखाली मुलीवर बलात्कार केल्या फाशीची शिक्षा, केंद्राचा वटहुकूम जारी

सामना प्रतिनिधी । कोरेगाव

भाकरवाडी (ता. कोरेगाव) येथील प्रबोधन निवासी अंध विद्यालय व प्रशिक्षण संस्थेत गेल्या तीन ते चार वर्षांपासून अल्पवयीन अंध विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुख्याध्यापक तुळशीराम चांदणे याला आज दुपारी अटक केली. कोरेगावच्या पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नंदा पाराजे यांनी कारवाई केली.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून या विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण सुरू होते. याबाबत संबंधित विद्यार्थिनी व तिच्या पालकांनी सन २०१३ मध्ये झालेल्या लैंगिक शोषणप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री रीतसर तक्रार दाखल केली. कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडल्याने हा गुन्हा कोरेगावकडे वर्ग करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नंदा पाराजे, हवालदार कमलाकर कुंभार व पोलीस नाईक मालोजी चव्हाण यांनी गुरुवारी दुपारी अचानक अंध विद्यालयात जाऊन संशयित मुख्याध्यापक तुळशीराम अंकुश चांदणे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून चौकशीनंतर सायंकाळी त्याला वैद्यकीय तपासणीनंतर अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नंदा पाराजे तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या