रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी शबाना आझमी यांच्या डायव्हरवर गुन्हा दाखल

861

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारचा शनिवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोलनाक्यानजिक भीषण अपघात झाला. या अपघातात शबाना आझमी जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी वर्सोवा येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे. या अपघात प्रकरणी शबाना आझमी यांचा ड्रायव्हर कमलेश कामत याच्याविरोधात खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कमलेश कामत याच्या विरोधात रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी खालापूर पोलिसांनी आयपीसी कलम 279 आणि 337 नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याशिवाय मोटार वाहन कायदा कलम 184 के अन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शबाना आझमी व त्यांचे पती गीतकार जावेद अख्तर कारने पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना खालापूर टोलनाक्याजवळ त्यांना भीषण अपघाताला सामोरे जावे लागले. कारने ट्रकला मागच्या बाजूने धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात शबाना व कारचालक गंभीररित्या जखमी झाले तर जावेद अख्तर यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या