शाहरुख खानच्या पाकिस्तानातील चुलत बहिणीचे निधन

1566

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याची पाकिस्तानातील चुलत बहिण नूर जहान हिचे कर्करोगाने निधन झाले आहे. शाहरुखचा भाऊ मसूर अहमद याने नूरच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

नूर जहान ही शाहरुख खानच्या वडिलांच्या भावाची मुलगी आहे. ती पाकिस्तानातील पेशावरमधील किस्सा खवानी बाजारातील मोहल्ला शाह वाली कुताल भागात राहायची. नूर जहान ही 2018 मध्ये खैबर पख्तुन्वा मतदारसंघातून सार्वत्रिक निवडणूक  लढवणार होती. मात्र शेवटच्या क्षणी तिने तिचा निवडणूक अर्ज मागे घेतला होता. जहान कुटुंबीयांचे शाहरुखच्या कुटुंबासोबत चांगले संबंध असून गेल्या काही वर्षात ते दोनदा शाहरुखच्या मुंबईच्या घरी येऊन गेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या