आमदार शहाजीबापू पाटलांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर

सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीला भीषण अपघात झाला आहे. सांगोला तालुक्यातील नाजरा गावाजवळ गुरुवारी दुपारी हा अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस गाडी (क्रमांक एम.एच. 13 डी.एम. 1940) आणि दुचाकीची (क्रमांक एम.एच. 45 एजी 6330) समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला व एकजण गंभीर जखमी झाला आहे. नाझरे गावच्या जिल्हा मार्गावरील अंतर्गत रोडवर हा अपघात झाला.

दरम्यान, या अपघातात दुचाकीलस्वार अशोक नाना वाघमारे (वय – 50, रा. माडगूळे. ता. आटपाडी, जि. सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पाठीमागे बसलेले नाना अमूने (रा. एकतपुर, ता. सांगोला) हे गंभीर जखमी झाले. अपघाताचे वृत्त समजताच महामार्गाच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले. मराठी वृत्तवाहिनी ‘साम टीव्ही’ने याबाबत वृत्त दिले आहे.