कोरोनाच्या संकटातही वनकर्मचाऱ्यांनी पशु-पक्ष्यासाठी बांधले पाणवठे

691

नरेश जाधव, खर्डी

कोरोनाची दहशत वाढत चालली असतानाही तानसा अभयारण्यातील वन्यजीव, प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी ठिकठिकाणी पाणवठे बांधण्याचे व त्यात टॅकरने पाणी ओतण्याचे काम शहापुरच्या वन्यजीव विभागातील वनकर्मचाऱ्यांनी केल्याने त्यांच्या माणुसकीचे कौतुक होत आहे. शहापूर तालुक्यात नैसर्गिक विपुलता असून येथे तानसा अभयारण्य आहे, परंतु ऐन उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना या वनातील पाण्याचे पाणवठे,तळे व डबके कोरडे ठाण पडले असल्याने येथील प्राण्यांना पाणी पिण्यासाठी मानवी वस्तीकडे वळायला लागले असल्याने लोक वस्तीतिल रहिवाश्यावर प्राण घातक हल्ले करीत आहेत.

गेल्या काही महिन्यापासून लोकवस्तीत बिबट्या, रानडुक्कर, निलगाय व सालीउदिर या सारखे हिस्र प्राणी हल्ले करीत असून त्यात अनेकांना आपला जीव व कहिना गभीर जख्मी व्हावे लागले आहे. भविष्यासाठी ही धोक्याची सूचना असल्याचे संकेत मिळत आहेत. यासाठी वनविभाग,सामाजिक संघटना यांनी वनात या प्राण्यांसाठी पाण्याची सोय करणे गरजेचे होते. याबाबत खर्डी वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल दर्शन ठाकुर यांच्या मार्गदर्शनात वन कर्मचाऱ्यांनी खर्डी,माहुली व बेंडकोंन येथे कृत्रिम पाणवठे तयार केले असून नैसर्गिक पाणवठयाची साफसफाई करण्यात येत आहे जेणे करून येथील प्राण्याची पाण्याची सोय होईल.

सर्वत्र लॉकडाऊन असताना तानसा अभयारण्यामधील खर्डी वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकुर यांच्या मार्गदर्शनात वनकर्मचारी व वनमजुर लॉकडाऊनच्या कालावधीत वन व वन्यजीव संरक्षण ,नियमित जंगल गस्त, प्राण्यासाठी नैसर्गिक तसेच कृत्रिम पाणवठ्यात पाण्याचे नियोजन करणे, वनवणवा पासुन जंगलाचे संरक्षण करणे अशी कामे पार पाडत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या