शाहीन बागवाले तुमच्या मुली, बहिणींवर बलात्कार करतील, भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

2361

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यात भाजप खासदारांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याचा सपाटा लावला आहे. अनुराग ठाकूर, राहुल सिन्हा आता प्रवेश वर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शाहीन बागवाले तुमच्या मुली बहिणींवर बलात्कार करतील असे वक्तव्य प्रवेश वर्मा यांनी केले आहे. तसेच आपण हे विधान मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.


दिल्ल्लीच्या शाहीन बागेत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यावर अनेक भाजप नेत्यांनी टीका केली आहे. भाजप खासदार प्रवेश वर्मा म्हणाले की, शाहीन बागेत लाखो लोक एकत्र आले आहेत. दिल्लीच्या जनतेचे विचार करून निर्णय घ्यावा. ते लोक तुमच्या घरी घुसतील आणि तुमच्या बहीण आणि मुलींवर बलात्कार करतील, त्यांना जिवे मारतील. हीच वेळ आहे. उद्या मोदीजी आणि अमित शहा तुम्हाला वाचवला येणार नाहीत असेही वर्मा म्हणाले.

तसेच दिल्लीत भाजप सत्तेत आली तर तासाभरात शाहीन बाग रिकामे केले जाईल असेही वर्मा म्हणाले. कश्मीर, उत्तर प्रदेश, हैद्राबादमध्ये जी आग लागली आहे, ती तुमच्या घरी पोहोचू शकते असेही वर्मा म्हणाले. त्याच्या या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. परंतु आपण जे काही बोललो ते सत्य होते त्यापासून आपण हटणार नाही असे वर्मा म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या