शाहीन बागमध्ये आंदोलन करणारे पाकिस्तानी, बांग्लादेशी; भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

521

दिल्लीच्या शाहीन बागेत नागरिकत्व सुधारित कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. यावर भाजपने पुन्हा टीकास्त्र सोडले आहे. यातील बहुतांश आंदोलनकर्ते हे बांग्लादेशी किंवा पाकिस्तानी आहे अशी टीका भाजप नेते राहुल सिन्हा यांनी केले आहे. शाहीन बागमधील आंदोलनकर्ते तुकडे तुकडे गँगचे असल्याची टीका केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली होती.

भाजप नेता राहुल सिन्हा म्हणाले की, “शाहीन बागमध्ये जे लोक नागरिकत्व सुधारित कायद्याला विरोध करत आहेत, त्यातील बहुतांश लोक हे बांग्लादेशी किंवा पाकिस्तानी आहे. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष हा संविधान विरोधी पक्ष आहे. त्यांचा या कायद्याला विरोध हा निरर्थक आहे. त्यांनी विधानसभेत या कायद्याविरोधात प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. परंतु संसदेच्या दोन्ही सभागृहात हा कायदा पारित झाला आहे. त्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरीही केली आहे. ममता बॅनर्जी हिंदू शरणार्थींच्या विरोधात असल्याची टीकाही त्यांनी केली.

 

आपली प्रतिक्रिया द्या