तुझ्या जन्माआधीच मी सेंच्युरी ठोकली होती; आफ्रीदीची अफगाणिस्तानी खेळाडू सोबत बाचाबाची

afridi

क्रिकेटमध्ये श्रीलंकेत सध्या लंका प्रीमिअर लीग सुरू आहे. यामध्ये सोमवारी या टूर्नामेंटमध्ये कँडी टस्कर्स आणि गॉल ग्लेडिएटरमध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद अफ्रीदी आणि अफगाणिस्तानचा युवा क्रिकेटपटू नवीन-उल-हक यांच्यात बाचाबाची झाली.

कँडी टस्कर्सने गॉल ग्लेडिएटरला पराभूत करून सीजन मधील पहला विजय मिळवला. टस्कर्सचा जलदगती गोलंदाज नवीन-उल-हक आणि ग्लेडिएटरचे मोहम्मद आमिर आणि शाहिद अफ्रीदीमध्ये झालेल्या बाचाबाचीने साऱ्यांचे लक्ष वेधले. सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू हस्तांदोलन करत होते. हस्तांदोलन सुरू असताना टस्कर्सचा जलदगती गोलंदाज नवीन-उल-हक समोर येताच शाहिदचा चेहरा बदलला. तो कडक शब्दात त्याला काही बोलत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. तिथल्या उपस्थितांच्या माहिती नुसार शाहिद त्याला म्हणाला की, बेटा तू जन्मालाही आला नव्हतास तेव्हा मी आंतरराष्ट्रीय सेंच्युरी ठोकली आहे. सामन्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याचीच चर्चा अधिक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या