तिरंग्यासोबत फोटो काढल्याने आफ्रिदीवर कौतुकाचा वर्षाव

11

सामना ऑनलाईन । बर्न

स्विर्त्झलँडच्या सेंट मॉर्टिजमध्ये खेळल्या गेलेल्या आईस क्रिकेट सामन्यात अनेक दिग्गज खेळाडू मैदानात उतरले होते. या सामन्यात पाकिस्तानचा खेळाडू शाहिद आफ्रिदीही दिसला. या सामन्यानंतरचा आफ्रिदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शाहिद अफ्रिदीने हिंदुस्थानी चाहत्यांसोबत फोटो काढले. त्यावेळी एका तरुणीच्या हातात असलेले तिरंग्यासोबत आफ्रिदीनं फोटो काढला.

आफ्रिदीने हिंदुस्थानच्या तिरंग्याबाबत दाखवलेलं प्रेम आणि आदर पाहून हिंदुस्थानींनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्विर्त्झलँडमधील आल्प्स पर्वतरांगाच्या कुशीत या आईस क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही स्पर्धा पाहण्यासाठी हिंदुस्थान, पाकिस्तान आणि इतर देशातील अनेक क्रिकेट चाहते स्विर्त्झलँडला पोहोचले होते.

वीरेंद्र सेहवागच्या टीम डायमंड्सला २-०ने पराभूत करत आफ्रिदिच्या टीम रॉयल्सने या मालिकेवर कब्जा केला. जॅक कॅलिस, ग्रॅम स्मिथ यांनी देखील या मालिकेत सहभाग घेतला. मात्र हिंदुस्थानी चाहत्यासोबतच्या फोटोसेशननंतर आफ्रिदिची चर्चा सर्वाधिक होताना दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या