चित्रपटाच्या सेटवर शाहीद कपूर गंभीर जखमी, ओठावर पडले 13 टाके

1055

अभिनेता शाहीद कपूर याला जर्सी चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला असून यात त्याच्या ओठाला 13 टाके पडले आहेत. अपघातानंतर शाहिदच्या चित्रपटाचे शूटींग थांबविण्यात आले आहे.

जर्सी या चित्रपटाचे चंदिगढ येथे शूटींग सुरू असताना शाहिदच्या ओढाला सिझन बॉल लागल्याने त्याच्या ओठातून रक्त वाहायला लागले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्या ओढावर 13 टाके घालण्यात आले. शाहीदची प्रकृती स्थिर असली तरी त्याला पुढील दोन आठवडे तरी शूटिंग करता येणार नाही. या घटनेनंतर शाहिद मुंबईत परत येणार असल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या