शाहिद कपूरची ‘जर्सी’ येतेय

अभिनेता शाहिद कपूर शेवटचा ‘कबीर सिंग’मध्ये दिसला होता. त्यानंतर त्याची एकही फिल्म आलेली नाही. लवकरच त्याची ‘जर्सी’ फिल्म रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘जर्सी’च्या प्रदर्शनाबद्दल स्वतः शाहिदने चाहत्यांना माहिती दिली. ही फिल्म दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.

शाहिदने जर्सी लुकचा फोटो शेअर करत लिहिलंय, ‘ सिनेमा दिवाळीला 5 नोव्हेंबर 2021 रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होईल. हा आत्म्याचा विजय आहे. या प्रवासाचा मला अभिमान आहे. सर्व टीमला समर्पित!’

काही दिवसांपूर्वी ‘जर्सी’चे शूटिंग संपल्याचे शाहिदने सांगितले होते. ऐन कोरोना काळात हे शूटिंग झाले होते.  ‘कोरोना काळात 47 दिवस शूटिंग करणं कठीण होतं. पण मला माझ्या टीमचा अभिमान आहे. हे कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हते. जे रोज जीव धोक्यात घालून सेटवर येत होते, त्या सर्वांचे मी आभार मानतो. ‘जर्सी’ची कहाणी प्रेरणादायी आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या