शाहीद कपूरसोबत झळकणार ‘ही’ मराठी अभिनेत्री

अभिनेता शाहीद कपूरचा कबीर सिंग हा चित्रपट तिकीटबारीवर चांगलाच गाजला. पद्मावतसारखा हिट चित्रपट करूनही झाकोळल्या गेलेल्या शाहीदला कबीर सिंगच्या यशाने चांगलाच हात दिला आहे. आता तो जर्सी या चित्रपटात दिसणार आहे.

शाहीदचा जर्सी हा चित्रपट मूळच्या जर्सी याच नावाच्या दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. एका अपयशी क्रिकेटपटूच्या वयाच्या तिशीत पुन्हा कारकिर्द सुरू करण्याच्या निर्णयाभोवती ही कथा गुंफण्यात आली आहे. मूळ चित्रपटाला दक्षिणेत प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळेच याच्या निर्मात्यांनी त्याचा हिंदी रिमेक करण्याची घोषणा केली होती. कबीर सिंगच्या यशामुळे पुन्हा चर्चेत आलेल्या शाहीद कपूरची या चित्रपटासाठी वर्णी लागली.

mrunal-thakur-1

या चित्रपटासाठी निर्माते नायिकेच्या शोधात होते. त्यांचा शोध एका मराठी अभिनेत्रीपाशी येऊन थांबला आहे. सुपर 30, बाटला हाऊस, लव्ह सोनिया अशा चित्रपटांमधून झळकलेली अभिनेत्री मृणाल ठाकूर ही या चित्रपटात शाहीद कपूरसह झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन गौतम तिन्नानुरी यांनी केलं असून हा चित्रपट 28 ऑगस्ट 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या