‘कुछ, कुछ होता है’ला 21 वर्ष पूर्ण, करणने सांगितला डेब्यू फिल्मचा खास अनुभव

1290

बॉलिवूडमधील काही चित्रपट प्रेक्षकांच्या खास स्मरणात राहतात. यात करण जोहर निर्मित ‘कुछ, कुछ होता है’ या चित्रपटाचीही वर्णी लागते. शाहरूख खान, राणी मुखर्जी आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला आज 21 वर्ष पूर्ण झाले आहेत. आजही तरुण वर्गामध्ये या चित्रपटाची, यातील संवादांची क्रेझ कायम आहे.

फ्रेंडशिप बँडपासून ते काजोलची साडी, शाहरूखचा टी-शर्ट, ‘कूल’ चैनपासून ते बास्केटबॉलपर्यंत तरुणांना या चित्रपटाने वेड लावले होते. 1998 मध्ये आलेल्या चित्रपटाची शाहरूख आणि काजोल यांच्या कारकीर्दीतील ‘सुपरहिट’ चित्रपटांमध्ये समावेश होतो. या चित्रपटामध्ये सलमान खान याने देखील पाहुण्या कलाकाराची छोटीशी पण आठवणीत राहणारी भूमिका साकारली होती.

सलमान आणि करणच्या मैत्रिची सुरुवात ‘कुछ, कुछ होता है’ या चित्रपटापासून झाली. या दोस्तीचाही एक खास किस्सा आहे. करण सांगतो की, सलमानला चित्रपटाची स्क्रिप्ट पाठवली आणि त्याची भेट घेण्यासाठी गेलो. चित्रपटाच्या फर्स्ट हाफपर्यंत त्याने कथा ऐकली. तोपर्यंत सलमानच्या एन्ट्रीचा मागसूमही नव्हता. तुझी एन्ट्री सेकंड हाफमध्ये आले असे मी सांगितले तरीही त्याने हा चित्रपट मी करणार असे म्हटले. त्यावेळी सलमान म्हणाला होता, यामुळे काही फरक पडत नाही… मला हा चित्रपट करायचा आहे. तुझ्या वडिलांनी मला खूप प्रेम दिले, असे करणने सांगितले. तसेच सलमानने हा चित्रपट माझ्यामुळे नाही तर जोहरमुळे स्वीकारला होता, असेही तो सांगतो.

दरम्यान, करणचे चाहते त्याला या चित्रपटाच्या रिमेकबाबत विचारत असतात. पुढील काही वर्षात ‘कुछ, कुछ होता है’ रिमेक येण्याची शक्यता जास्त आहे. कारण मेलबर्नमध्ये आयोजित इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण जोहरला याबाबत विचारण्यात आला असता त्याने जर चित्रपटाचा रिमेक बनलवा तर रणवीर सिंह राहुलच्या भूमिकेत, आलिया भट्ट अंजली आणि जान्हवी कपूर टिनाच्या भूमिकेत दिसेल.


View this post on Instagram

3 in 1 ( Love ) @official_kuchkuchhotahai . #kuchkuchhotahai #fensterkuchkuchhotahai

A post shared by Kuch Kuch Hota Hai (@official_kuchkuchhotahai) on

आपली प्रतिक्रिया द्या