शाहरूखचा मन्नत बंगला पुन्हा वादात

31

सामना ऑनलाईन, मुंबई

बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा ‘मन्नत’ हा बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मन्नत बंगल्याच्या जागेच्या भाडेकरारातील अटी-शर्थीचे उल्लंघन केल्याचा आरोप असून या प्रकरणी शाहरुखला कोट्यवधींचा दंड होण्याची शक्यता आहे.

शाहरूखच्या मन्नत बंगल्याची जागा शासनाची असून ती भाडेकराराने शाहरुखने राहायला घेतली होती. मात्र या भाडेकरारातल्या अटी-शर्थीचे उल्लंघन झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे शाहरुखकडून कोट्यवधींचा दंड आकारला जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी अंधेरीतील तहसीलदार कार्यालय आणि एच वॉर्डचा अहवालही मागवण्यात आला आहे. दोन्ही अहवालांची तपासणी झाल्यावर पुढची कारवाई निश्चित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या