शक्ती कपूरने श्रद्धाला फरहानच्या घरातून खेचत बाहेर आणले

62

सामना ऑनलाईन। मुंबई

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर हे गेल्या काही दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रद्धाच्या लिव्ह इन रिलेशनशिपमुळे संतापलेल्या तिच्या वडीलांनी म्हणजेच शक्ती कपूर यांनी तिला फरहानच्या घरातून खेचत बाहेर काढले आहे. त्यानंतर श्रद्धा व तिच्या वडीलांमध्ये जोरदार भांडण देखील झाले मात्र तमाशा नको म्हणून श्रद्धा तिथून निघून गेली.

रविवारी शक्ती कपूर व श्रद्धाची मावशी पद्मिनी कोल्हापुरे फरहानच्या वांद्र येथील घरी गेले होते. त्यांनी श्रद्धाला फरहान सोबत त्याच्या घरी न राहता स्वतःच्या घरी परतायला सांगितले. मात्र श्रद्धा ऐकत नाही बघून तिच्या वडीलांचा पारा चढला व त्यांनी हाताला धरुन खेचत श्रद्धाला घराच्या बाहेर काढले. फरहानच्या बिल्डिंगमध्ये राहणारे काही रहिवासी देखील हा प्रकार बघत होते त्यामुळे श्रद्धाने लगेच तेथून काढता पाय घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या