बेड मिळत नाही म्हणून उत्तर प्रदेशातून 1500 कि.मी.चा प्रवास, शमशाद खानला मुंबईने वाचवले

उत्तर प्रदेशातील एका तरुणाने ऑक्सिजन व बेडच्या शोधासाठी ऑक्सिजनची पातळी अवघी 50 तर कोरोनाचे 90 टक्के इन्फेक्शन असतानाही अॅम्ब्युलन्सने तब्बल 1500 कि.मी.चा प्रवास करीत मुंबई गाठल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील अनेक शहरांत कोरोनाच्या दुसऱया लाटेने आरोग्य यंत्रणा कोलमडली असताना अखेर मुंबई शहर या तरुणाच्या मदतीसाठी पुढे आले आहे.

उत्तर प्रदेशच्या फैजाबाद येथील तरुण शमशाद खान याला कोरोनाच्या संसर्गाने बेजार केल्यानंतर कोणत्याही रुग्णालयात बेड मिळत नव्हता. त्याने लखनौ, गौंडा आणि गोरखपूर या शहरात बेडसाठी विचारणा केली असता त्याला सर्वत्र नकार मिळत होता. बेड मिळू शकतो, परंतु ऑक्सिजन बेड देण्यासाठी कोणी तयार नव्हते. शेवटी मुंबईत डॉ. खालीद यांच्याशी त्याने संपर्क केला.

त्यानंतर येथे बेड उपलब्ध असल्याची खात्री झाल्यानंतर शमशाद याला उत्तर प्रदेश येथून अॅम्ब्युलन्सने आणण्याचा निर्णय घेण्यात आला. दीड हजार कि.मी.चा प्रवास ऑक्सिजन लेव्हल कमी असतानाही जीव वाचविण्यासाठी इतक्या गंभीर स्थितीत हे धाडस करण्यात आले. या प्रवासाला तब्बल 26 तास लागले. अखेर मुंबईत 15 ते 20 दिवस आयसीयूमध्ये काढल्यानंतर त्याची तब्येत आता सुधारत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या