Photo – शेनिस पॅलासिओस ठरली 2023 सालची ‘मिस युनिव्हर्स’

मध्य अमेरिकेतील निकाराग्वा येथील शेनिस पॅलासिओस हिने 2023 सालचा ‘मिस युनिव्हर्स’चा मुकुट जिंकला आहे. या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत निकाराग्वा देशाने प्रथमच मानाचा मुकुट मिळवला आहे.

‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा 72 शनिवारी रात्री सॅन साल्वाडोर, एल साल्वाडोर येथील जोस अडोल्फो पिनेडा एरिना येथे आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत मिस थायलंड अँटोनिया पोर्सिल्ड फर्स्ट रनर अप तर मिस ऑस्ट्रेलिया मोराया विल्सन सेकंड रनर अप ठरली. ‘मिस युनिव्हर्स’ने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर ही माहिती शेअर केली आहे.

मिस युनिव्हर्सने तिच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केले, “मिस युनिव्हर्स 2023 ही शॅनिस पॅलेसिओस आहे.” पॅलासिओसचा मुकुट अमेरिकेच्या आर’बोनी गॅब्रिएलने घातला. ज्याने 2022 सालासाठी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला.

मिस युनिव्हर्स जिंकल्यानंतर शॅनिस पॅलासिओस भावूक होताना दिसली. तिचे डोळे भरून आले आणि ती देवाचे आभार मानताना दिसली.

तिने पांढऱ्या रंगाचा शिमरी स्टोन वर्क गाऊन घातला होता. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शेनिसने अँटोनिया पोर्सिल्डचा हात धरलेला दिसला. तिचे नाव घोषित होताच तिला आनंदाने रडू कोसळले.