माझ्या सुरक्षेसाठी असलेले संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी वापरा – मंत्री शंकरराव गडाख

484

मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मंत्री म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलीस वाहने संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी वापरण्याची परवानगी नगर पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून दिली आहे.

‘देश आणि महाराष्ट्र कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आहे. याचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आाहे. आपल्या भागातील संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी संपुर्ण पोलीस यंत्रणा आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर आलेला अधिकचा ताण पाहता मंत्री म्हणून माझ्या (Spotting) सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी व ते वापरत असलेले वाहन आपण शहर व परिसरातील संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी वापरण्यास माझी काहीही हरकत नाही’, असे मंत्री गडाख यांनी पत्रात लिहले आहे.

‘माझ्या सुरक्षेपेक्षा देशाची तसेच महाराष्ट्राची व येथील जनतेची सुरक्षा महत्वाची आहे. महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे ते कर्तव्य आहे. त्या करिता मी आजपासून माझ्या सुरक्षेसाठी असलेले पोलिस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलिस वाहन कोरोना व्हायरस प्रार्दुभाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेत वापरण्यास आपणास याद्वारे परवानगी देत असल्याचेही त्यांनी पोलीस अधीक्षक यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या