शंकरराव गडाखांचे नेवासा तालुक्यात जोरदार स्वागत, टपरीवर घेतला चहाचा आस्वाद

1654

शंकरराव गडाख यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच नेवासा तालुक्यात आले. गडाख यांचे नेवासा तालुक्यात जोरदार स्वागत झाले. सोनई येथील त्यांच्या निवासस्थानी नेवासा तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील हितचिंतकानी मोठी गर्दी केली होती. गेल्या 25 वर्षांपासून त्यांचे संपर्क कार्यालय असलेल्या हॉटेलमध्ये बाकड्यावर बसून त्यांनी चहाचा आस्वादही यावेळी घेतला.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गडाख यांनी बुधवारी सकाळी 9 वाजता वंजारवाडी येथे जाऊन भगवानबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. गडाख यांना महिलांनी औक्षणही केले. यावेळी त्यांनी सोनई येथील मानाचा मारुती मंदिरातही जाऊन दर्शन घेतले.

‘पद येतात जातात पण आपल्या माणसापासून मला कोणतेही पद, मंत्रिपद दूर होऊ देणार नाही याची मी नक्कीच काळजी घेणार आहे’, असे प्रतिपादन शंकरराव गडाख यांनी सोनई येथे कार्यकर्त्यांच्या भेटी दरम्यान केले. मिळालेले मंत्रीपद तालुक्याच्या आणि महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेचया हितासाठी मी पणाला लावणार आहे. यशवंतराव गडाख यांनी राजकारणातून समाजकारण केले त्याचा वारसा मी पुढे घेऊन जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या धोरणाप्रमाणे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हेच माझे धोरण असणार असल्याचे विधान यावेळी गडाख यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या