शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांची मोटार पलटी, खंडाळा घाटातील घटना

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असताना या ताफ्यातील पोलीस पायलेटिंग मोटार मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाखाली पलटी झाली. या अपघातात एक पोलीस निरीक्षक किरकोळ जखमी झाले.

सोमवारी (दि. 29) सकाळी सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली. अपघातांनतर दहा मिनिटात शरद पवार यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला. पोलीस निरीक्षक बाबर हे या अपघातात जखमी झाले आहेत. ते मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर सोमवार आज अपघातवार ठरला. सकाळी खोपोली शहराच्या हद्दीत ढेकू गावाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. या अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या