शरद पवार यांनी घेतला दुसरा डोस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बुधवारी कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला. 1 मार्च रोजी साहेबांनी लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर एक महिन्याने त्यांनी दुसरा डोस घेतला आहे.

योगायोग म्हणजे आज जागतिक आरोग्य दिन आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या नियमानुसार प्रत्येकाने आपापले लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जे.जे. रुग्णालयाच्या परिचारिका श्रद्धा मोरे यांनी लस दिल्याबद्दल पवारसाहेबांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व वैद्यकीय पथक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या