शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार

51

सामना ऑनलाईन । नई दिल्ली

हिंदुस्थानच्या प्रजासत्ताकदिनाच्या पाश्वभूमीवर बुधवारी नागरी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.भाजपचे ज्येष्ठ नेता मुरली मनोहर जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, लोकसभेची माजी सभापची दिवंगत पी. ए. संगमा, तमिळनाडूचे आध्य़ात्मिक गुरु जग्गी वासुदेव, प्रख्यात गायक येसुदास यांची पद्मविभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून सहाजणांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत. देशात सर्वोच्च नागरी भारतरत्न पुरस्कारानंतर पद्मविभूषण पुरस्काराचा सन्मान आहे.

यावर्षी ७ जणांना पद्मविभूषण, ७ जणांना पद्मभूषण तर ७५ व्यक्तींना पद्मत्री पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यावेळी १७ महिलांना पद्म सन्मान मिळाला आहे. तर सहाजणांना मरणोतत्र पद्म पुरस्कार देण्यात येणार आहे. क्रिकेटपटू विरोट कोहली यांनी पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री  शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार घोषीत झाला आहे. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, शेफ संजीव कपूर, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब धर्माधिकारी, गायक कैलाश खेर, लेखिका भावना सौम्या, डॉ. तेहम्तोन उदवादिया यांना पद्मपुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या