50 वर्षांच्या राजकारणात असे कधी घडलेच नाही, आमदारांच्या नियुक्त्या रखडवणाऱया राज्यपालांवर शरद पवारांची नाराजी

मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने शिफारस केलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे राज्यपालांनी अडवून ठेवणे असा प्रकार गेल्या 50 वर्षांच्या राजकारणात कधीच घडला नाही अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

मंत्रिमंडळाने शिफारस करून प्रस्ताव पाठवला की राज्यपाल तो मंजूर करत असत, परंतु यावेळेला तसे घडले नाही. त्यामुळे आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत असे पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या