दोन्ही काँग्रेसची आघाडी नक्की; जागावाटप आठवडाभरात

33
शरद पवार – 1) 18 जुलै, 1978 ते 17 फेब्रुवारी, 1980 (पुलोद), 2) 26 जून, 1988 ते 25 जून 1991 (काँग्रेस), 3) 6 मार्च, 1993 ते 14 मार्च, 1995 (काँग्रेस)

सामना प्रतिनिधी। पुणे

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत आपल्या तीन बैठका झाल्या आहेत असे सांगतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी नक्की झाली असून जागावाटप आठवडाभरात होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली.

काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी लोकसभा, विधानसभा निवडणुकांत राहील असे सांगून ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आमच्या आघाडीतील दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणार नाहीत. तशी पद्धत आमच्यात नाही. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय होईल. भाजप-शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही काँग्रेसमधील शेकाप, रिपब्लिकन पक्षालाही आघाडीत घेतले जाईल. भाजपविरोधात प्रकाश आंबेडकर हे तयार करत असलेल्या आघाडीच्या प्रयत्नांमध्ये माझी हजेरी नसेल. पण आमच्या पक्षाचे नेते त्यात प्रतिनिधित्व करतील, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या