शरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील – नवाब मलिक

1255

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज पुण्यात बैठक पार पाडली. या बैठकीत कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. शरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली.

सत्ता स्थापनेचा तिढा न सुटल्याने केंद्राने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात कोअर कमिटीची बैठक बोलावली होती. या बैठकीत शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, नवाब मलिक असे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

बैठक संपल्यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मलिक म्हणाले की “राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. ती संपुष्टात आणली पाहिजे. राज्यात स्थिर सरकार स्थापन झाले पाहिजे. उद्या पवार साहेब काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतील. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होईल.” त्यानंतरच निर्णय घेतला जाईल असे मलिक यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या