शिंदेंनी काँग्रेस पक्षाबद्दल बोलावं! शरद पवार भडकले

2273

मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असून माझ्या पक्षाची स्थिती मला अधिक चांगली माहिती आहे. सुशीलकुमार शिंदेंनी त्यांच्या पक्षाबद्दल बोलावे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्दय़ावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना उत्तर दिले आहेत. राष्ट्रवादीबद्दल शिंदे सांगू शकत नाहीत. ते काँग्रेसबद्दलच बोलू शकतात, असेही पवार म्हणाले.

‘थकलेल्या’ काँग्रेस-राष्ट्रवादीचं विलिनीकरण? सुशीलकुमार शिंदेंचं सूचक विधान

जळगाव येथील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना शिंदे यांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी पवार यांनी संतापही व्यक्त केला तसेच त्यांना खडे बोल सुनावले. सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेस पक्षाबाबत बोलले असावेत, असेही पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जळगाव जिह्याच्या दौऱ्यावर असताना पवार यांनी मंगळवारी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. पवारांनी जळगाव जिह्यातील विकासाची सद्यस्थिती तसेच भाजप सरकारची पाच वर्षांतील कामगिरी अशा विविध मुद्दय़ांवर मते मांडली.

माझ्या वयाबद्दल विचारू नका, मी तुमच्या पक्षाचा अध्यक्ष
अकोल्यातील वडगाव येथील एका प्रचार सभेत व्यासपीठावर नेत्यांनी शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख केला. यावर ‘अभी तो मै जवान हूं’ असे म्हणत सर्वांना घरी पाठवूच, मग मी घरी जाणार. मी तुमच्या पक्षाचा अध्यक्ष आहे, असेही पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या