साताऱ्यात शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना डिवचलं, वाचा सविस्तर…

9334


राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना साताऱ्यामध्ये शक्तीप्रदर्शन केले. साताऱ्यात रॅली काढून पवार यांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना स्वाभिमानावरून डिवचले आहे. शरद पवार यांना विधानसभा आणि लोकसभा जिंकून मला पुन्हा गुलाला उधळायला बोलवा असे म्हणत एकप्रकारे उदयनराजेंना पराभूत करण्याचा इशारा दिला.

उमेदवारी घोषित झालेल्या राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्या भाजपच्या वाटेवर

रविवारी शरद पवार यांना शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपध्ये दाखल झालेल्या उदयनराजे यांच्या साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी उदयनराजेंवर स्वाभिमानावरूनही टीका केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा इतिहास निर्माण केला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराज दिल्लीला गेले. परंतु औरंगजेबाच्या दरबारात महाराजांचा योग्य सन्मान केला गेला नाही. महाराज तिथून परत आले. त्यामुळे त्यांना आग्र्याच्या तुरूंगात ठेवण्यात आले. मात्र महाराजांनी परत येऊन स्वराज्य निर्माण केलं. आणि आता…? असे म्हणत पवारांनी उदयनराजे यांना टोला लगावला.

पवार पुढे म्हणाले, मला जयंतराव सांगत होते, मी यामध्ये भूमिका घेतली पाहिजे. पण मी त्यांचा सल्ला ऐकला नाही. कारण त्या गादीबद्दल मला आदर आहे. महाराष्ट्र धर्म ज्या गादीने शिकवला ती ही गादी आहे. यशवंतराव चव्हाण आणि क्रांतीसिंह नाना पाटलांचा हा जिल्हा आहे. त्यामुळे कामाला लागा. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासह लोकसभा जिंका आणि मला गुलाल उधळायला बोलवा, असे आवाहन पवारांनी कार्यकर्त्यांना केले.

आपली प्रतिक्रिया द्या