राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा झालेल्या पराभवाला ते जबाबदार असल्याचे सोमवारी एका सभेत सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवारांना जोरदार टोला लगावला आहे.
अजित पवार यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी अजित पवार यांनी एका सभेत मी दिलेला खासदार जर तुम्ही निवडून आणून दिला नाही तर मी विधानसभा लढवणार नाही असे वक्तव्य केलं होतं. दरम्यान लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव केला.
त्यानंतर सोमवारी 5 ऑगस्टला एका सभेत अजित पवार यांनी बारामतीच्या पराभवाला ते जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या दोन्ही भाषणांचे व्हिडीओ पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवारांना एक आव्हान केले आहे.
”राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायम ते शब्दाचे पक्के असल्याचे सांगितले. परंतु जर अजित पवार हे स्वतःच आता पराभव माझ्यामुळेच झाल्याचे मान्य करत असतील तर त्यांनी शब्दाला जागून येणारी विधानसभा न लढवता राहून दाखवावे”, असे आव्हान अजित पवारांना केले आहे.