Live – शरद पवार यांची पत्रकार परिषद

848
sharad-pawar
 • कर्जमाफीसंदर्भात माझ्याशी मुख्यमंत्र्यांची झालेली आहे, या बैठकीला मुख्य सचिवही उपस्थित होते
 • महाराष्ट्रानेही 8 राज्यांनी जी भूमिका घेतली आहे त्याच्याशी सुसंगत भूमिका घेतली तर बरे होईल
 • NRC बाबत मुख्यमंत्र्यांनाही चिंता आहे असे दिसते आहे
 • सत्तेचा गैरवापर पोलिसांनी केला असेल तर त्यांची चौकशी झाली पाहिजे
 • मला पत्र आली आहेत, ज्यात म्हटलंय की तुमची हत्या करेन
 • NRC संबंधी लोकांच्या तीव्र भावना आहे, मात्र त्या शांततेच्या आणि संयमी मार्गानेच व्यक्त केल्या पाहिजेत
 • महाराष्ट्र सरकारला आग्रह असेल की निस्पृह अधिकारी, न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीशांची एक विशेष तपास समिती नेमावी
 • याची (पोलीस अधिकाऱ्यांची ) चौकशी होणं गरजेचं आहे
 • पोलीस आयुक्त आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी अधिकाराचा पूर्ण गैरवापर करून मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणून या लोकांना तुरुंगात ढकलले आहे
 • पुणे पोलिसांचे वागणे अत्यंत आक्षेपार्ह आहे
 • कवितेची कडवी म्हटली म्हणजे ती व्यक्ती शहर पेटवायला निघाली असे होत नाही
 • एल्गार परिषदेतील नामदेव ढसाळ यांच्या कवितेचा उल्लेख केला
 • याबद्दलची चौकशी करण्याची गरज आहे, सध्याच्या राज्य सरकारने यासंदर्भातील जाणकारांची समिती नेमून चौकशी करावी
 • राज्याची आर्थिक शिस्त उध्वस्त करण्याचे काम फडणवीस सरकारच्या कारकिर्दीत झाले आहे
 • 66 हजार कोटींच्या खर्चाचा मेळ प्राप्त झाला नाही असं कॅगने अहवालात म्हटले आहे
 • 5 वर्षांच्या भाजपच्या राज्यातील कारभाराबाबत कॅगचा अहवाल गंभीर आहे
 • या कायद्याला विरोध फक्त अल्पसंख्यकांचा नाही तर अनेक घटकांचा याला विरोध आहे
 • मॅगसेसे पुरस्कार मिळालेल्या 9 जणांनी या कायद्याला विरोध केला आहे
 • आज केंद्र आणि राज्य यात अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे
 • रामविलास पासवान यांच्या पक्षानेही या कायद्याला विरोध केला आहे
 • एनडीएतील घटक पक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाने बिहारमध्ये हा कायदा लागू करण्यास नकार दिला आहे
 • 8 राज्यांनी आम्ही नागरिकत्व संशोधन कायद्याची अंमलबजावणी करणार नाही अशी भूमिका घेतली
 • हा उद्रेक राज्यात होईल असं वाटलं नव्हतं
 • देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे, त्यावरून लक्ष हटवण्यासाठी काळजी घेतली जात आहे
 • सरकारने फक्त 3 देशांवर लक्ष का केंद्रीत केलं? इतर देशांवर ते का केलं नाही?
 • दिल्लीतील अनेकांकडे घरे सांभाळण्याची जबाबदारी ही नेपाळ्यांकडे आहे
 • दिल्लीतील मी ज्या सरकारी घरात राहतो तिथे दोन नेपाळी व्यक्ती घरातील काम सांभाळतात
आपली प्रतिक्रिया द्या