शरद पवारांच्या सुरक्षेत केंद्र सरकारकडून कपात, राष्ट्रवादीचा आरोप

sharad-pawar-new

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभेतील खासदार शरद पवार यांच्या दिल्लीतील बंगल्याच्या सुरक्षेत केंद्र सरकारने कपात केली आहे. यावरून राष्ट्रवादीने केंद्र सरकारला फटकारले असून केंद्र सरकार सूडाचा राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

‘शरद पवार यांना दिल्लीत ‘वाय’ दर्जाची सुरक्षा केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे. त्यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या सरकारी बंगल्यावर जे सुरक्षा रक्षक तैनात होते त्यांनी 20 जानेवारी पासून बंगल्यावर येणे थांबवले आहे. त्यांना हटविण्यात आल्याबद्दलही कुणी काही सांगितलेले नाही. हे सूडाचे राजकारण आहे. आम्ही केंद्र सरकारच्या अशा कुठल्याही प्रकारांना घाबरत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृह मंत्री अमित शहा यांच्या विरोधातील आमचा लढा सुरुच राहणार’, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या