शरद पवार व श्रीनिवास पाटील यांच्या मैत्रीला दिल्लीत उजाळा

2606

महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,व काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर केंद्रातील संसदेच्या अधिवेशनामध्ये उपस्थित राहण्यासाठी शरद पवार सध्या दिल्ली मुक्कामी आहेत. यावेळी सातारा लोकसभा मतदार संघातून नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील या दोन परममित्राची भेट झाली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक व सातारा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये या दोन मित्रांच्या मैत्री बद्दल बरीच चर्चा रंगली होती.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुका व सातारा लोकसभा पोटनिवडणूकी दरम्यान सातारा येथे शरद पवार यांची भर पावसात झालेली सभा, ही राज्यभर गाजली होती. या सभेवेळी शरद पवार बोलत असताना त्यांच्या शेजारी श्रीनिवास पाटील हे भर पावसात उभे होते. शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची मैत्री फार जुनी आहे. समाजकारणात व राजकारणात या दोन परम मित्रांनी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. जीवनापासून पुण्यामध्ये दोघे एकत्र महाविद्यालयीन शिक्षणासाठी बरोबर होते.

श्रीनिवास पाटील यांचा आलेख पाहिला तर, ते प्रारंभीच्या काळामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी महत्त्वाचे काम केले आहे. त्यानंतर ते खासदार झाले, खासदारकी संपल्यानंतर सिक्कीमचे राज्यपाल म्हणून त्यांना संधी मिळाली आणि पुन्हा एकदा श्रीनिवास पाटील सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. दिल्लीमध्ये नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि सातारा लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार यांची भेट झाली. या प्रसंगी एक अतिशय सुंदर टिपलेले त्यांचे प्रसन्नामुद्रा असलेले मंगळवारीच टिपलेले छायाचित्र मिळाले, यामुळे त्यांच्या मैत्रीच्या आठवणी पुन्हा एकदा जागृत झाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या