
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच यावेळी त्यांनी आपली लोकशाही वाचविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
”राहुल गांधी व फैजल यांची खासदारकी रद्द करणे हे संविधानातील सिंद्धांताच्या विरोधात आहे. हे निषेधार्थ तसेच संविधान ज्या मूल्यांवर आधारित आहे त्याच्याविरोधातील आहे. आपलं संविधान प्रत्येक व्यक्तीला योग्य न्याय मिळवून द्यायची खात्री देतं. विचारांचं स्वातंत्र्य, समानतेचा हक्क देतं. तसेच प्रत्येक हिंदुस्थानीची प्रतिष्ठा राखली जाते” असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.