त्यांच्या त्याग आणि समर्पणाला तोड नाही, पण स्वातंत्र्यवीर सावरकर हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही – शरद पवार

स्वातंत्र्यावीर सावरकर यांनी देशासाठी केलेला त्याग आणि समर्पणाला तोड नाही, पण सद्य परिस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही. देशात व राज्यात अनेक महत्त्वाचे आणि गंभीर प्रश्न आहेत, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकरांच्या मुद्दय़ावरून राजकारण करू पाहणाऱया भाजपला फटकारले.

नागपूर दौऱयावर असलेल्या शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी राहुल गांधी यांच्यासोबत साकरकर विषयावर बोलण झाले का, असा प्रश्न केला असता शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, राज्यातील आणि देशातील अनेक प्रश्नांवर आमच्यामध्ये चर्चा होते आणि झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही. याचा अर्थ त्यांचे महत्त्व नाही असे नाही. देशासाठी त्यांनी केलेला त्याग आणि समर्पणाला तोड नाही. आपल्याला प्रगतशील विचारांचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करणारे सावरकर स्वीकारावे लागतील, असे त्यांनी सांगितले.

संभाजीनगर प्रकरणावर अधिक चर्चा नको

‘अलीकडच्या काळात संभाजीनगर आणि मुंबईतील मालकणी येथे काही प्रकार घडले आहेत. या दोन्ही ठिकाणी धार्मिक स्करूप आहे की काय? अशी चिंता काटण्याची स्थिती होती.’ याकर काही राजकीय लोकांनी मतं क्यक्त केली आहेत, पण या सगळय़ासंबंधी अधिक चर्चा होणं योग्य नाही. आता परिस्थिती निकळली आहे. तसेच हा धार्मिक प्रश्न आहे. अशीच परिस्थिती पुढे राहणार नाही याची खबरदारी सार्कजनिक जीकनात काम करणाऱया लोकांनी घ्यावी, असे शरद पवार म्हणाले.

सत्ताधाऱयांकडून निवडणुका धार्मिक मुद्दय़ावर

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र या निवडणुका एकत्रित होणार नाहीत असा माझा अभ्यास सांगतो, असे पवार यांनी सांगितले. जानेवारी 2024 मध्ये राममंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे आणि त्यानंतरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. हे लक्षात घेता या निवडणुका सत्ताधाऱयांकडून धार्मिक मुद्दय़ावर लढवल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र महाविकास आघाडी राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीचे मुद्दे घेऊन निवडणुकांना सामोरे जाईल, असे पवारांनी स्पष्ट केले.

पवार-गडकरी 40 मिनिटे चर्चा

शरद पकार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जकळपास 40 मिनिटे चर्चा झाली. पत्रकारांनी गडकरी यांच्याशी काय चर्चा झाली असे विचारले असता पवार म्हणाले, मी त्यांच्याकडे भोजनासाठी गेलो होतो, विदर्भात उसाकरिता संशोधन केंद्र सुरू व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

अदानीप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींकडून चौकशी करा

अदानी यांच्या शेल कंपन्यांमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक कोणी केली याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली आहे. या मागणीला राष्ट्रवादीचाही पाठिंबा आहे. मात्र याव्यतिरिक्त सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींची एक समिती स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य बाहेर आणावे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.