बुलेट ट्रेन, कॉरिडॉरचा पालघरच्या शेतकऱ्यांना काय फायदा?

34

सामना ऑनलाईन । डहाणू/वाणगाव

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा एक्प्रेस वे आणि कॉरिडॉर हे तीन मोठे प्रकल्प एकाच पालघर जिह्यातून नेण्याची मोदी सरकारची योजनाच कळेनाशी झाली आहे. या तीन मोठ्य़ा प्रकल्पांसाठी स्थानिक गावकरी आणि शेतकऱ्यांची जमीन हस्तगत करून त्यांना भूमिहीन करायचे हे मोदी सरकारचे धोरण मुळीच योग्य नाही, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाल्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले केंद्रातील मोदी सरकार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा एक्प्रेस वे आणि कॉरिडॉर असे तीन मोठे प्रकल्प याच पालघर जिह्यातून नेणार आहे. जनतेच्या जमिनी मोठ्य़ा प्रमाणावर या प्रकल्पात जाणार आहेत. विकासाला जनतेचा विरोध नसतो, पण या प्रकल्पांची त्यांना खरच गरज आहे का, याचा फायदा त्यांना होणार आहे का याचा विचार सरकारने करायला हवा.

आपली प्रतिक्रिया द्या