शरद पवार-सोनिया गांधी यांची सोमवारी चर्चा

616

राज्यात सत्तास्थापनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट सोमवारी नवी दिल्लीत होणार आहे. ही भेट रविवारी होणार होती पण काही कारणास्तव रद्द झाल्याचे सांगण्यात आले.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने किमान समान कार्यक्रम निश्चित केला असून सोमवारी पवारसोनिया यांच्यात त्यावर चर्चा होणार आहे. दरम्यान, रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आणि कोअर कमिटीची बैठक होणार असल्याची माहिती पक्षप्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या