निवडणुकीआधी आघाडीने पंतप्रधानपदाचा उमेदवार देण्याची गरज नाही!

28

सामना प्रतिनिधी । मुंबई

आगामी लोकसभा निवडणुकीत जे पक्ष भाजपसोबत नाहीत अशा सर्वांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्या पक्षाचे सर्वाधिक खासदार निवडून येतील त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल. त्यामुळे आघाडीकडून निवडणुकीआधी पंतप्रधानपदाचा उमेदवार देण्याची गरज नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून शरद पवार यांनी यशवंतराक चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेससोबतच्या आघाडीचा त्यांनी पुनरुच्चार केला. निवडणुकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार असणार नाही हे काँग्रेसने याआधीच स्पष्ट केले आहे. राजकारणातील बदल स्वीकारण्यास तयार असणाऱ्या पक्षाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल. असाच समजूतदारपणा सर्वांनी दाखवावा, असे ते म्हणाले. 2004च्या लोकसभा निवडणुकीत यूपीएने पंतप्रधानपदासाठी कोणालाही पुढे न करता निवडणूक जिंकली होती. त्यानंतर एकत्र येत मनमोहनसिंग यांना पंतप्रधान पदी बसवले होते. त्यामुळे निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा उमेदवार देण्याची गरज नाही, असे पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या