Lok Sabha Election 2019 – नाही,नाही.. म्हणत शरद पवार निवडणुकीला तयार

28
शरद पवार – 1) 18 जुलै, 1978 ते 17 फेब्रुवारी, 1980 (पुलोद), 2) 26 जून, 1988 ते 25 जून 1991 (काँग्रेस), 3) 6 मार्च, 1993 ते 14 मार्च, 1995 (काँग्रेस)

सामना ऑनलाईन, मुंबई

मी पुढची निवडणूक लढवणार नाही असे म्हणणारे शरद पवार अखेर निवडणूक लढवण्यासाठी तयार झाले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमध्ये आज बैठक पार पडली, या बैठकीमध्ये शरद पवार 2019 ची लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं सांगण्यात आलं.

ऑक्टोबर 2018 साली म्हणजेच अवघ्या तीन महिन्यांपूर्वी शरद पवार यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी ते पुण्यातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. त्यावेळी या चर्चांना पूर्णविराम देताना ‘मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. माझ्या नावाची उगाचच चर्चा करू नका, अशी तंबी पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना दिली होती.’ त्यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांचा मुलगा पार्थ यांच्या संभाव्य उमेदवारीवरही शरद पवार यांनी काट मारली होती. कुटुंबातील सदस्यांनी निवडणुका लढवल्या तर सामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी कधी मिळणार, असे खडे बोलही पवार यांनी त्यावेळी सुनावले होते.

आपली प्रतिक्रिया द्या