अजित पवारांचा परतीचा निर्णय शरद पवार घेतील

कुटुंबापासून फारकत घेतलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना परत यायचे असेल तर त्याचा सर्वस्वी निर्णय शरद पवार हे घेतील. शरद पवार यांचे मन मोठे आहे. पण अजित पवार त्यांच्याकडे जातील का, हाही प्रश्न आहे. दोघांच्याही डोक्यात काय चाललेय हे कळू शकत नाही, असे मत उपमुख्यमंत्री पवार यांचे बंधू श्रीनिवास यांनी व्यक्त केले. बारामतीत विधानसभेला युगेंद्र पवार उभे राहतील का, याचा निर्णय शरद पवार, जयंत पाटील व सुप्रिया सुळे घेतील, असेही ते म्हणाले.

बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजित पवार यांना कानपिचक्या दिल्या. शिवाय ममत्वही दाखवले. प्रचार काळात अजित पवार यांनी कुटुंबियांवर केलेल्या टीकेवर श्रीनिवास पवार म्हणाले, अजित पवार आमच्या सगळ्यांमध्ये वयाने मोठे आहेत. मोठा भाऊ हा वडिलांसमान असतो. तो धाकटय़ा भावाला, बहिणीला काही बोलला ते धरून ठेवायचे नसते.