INDvENG ‘त्या’ रात्री नक्की काय घडलं? मँचेस्टर कसोटीबाबत शार्दुल ठाकूरने केला मोठा खुलासा

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचा क्रीडाप्रेमींसाठी वेदनादायक झाला. हिंदुस्थानचा संघ मालिकेत 2-1 आघाडीवर होता आणि पाचवा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार होता. मात्र हा सामना सुरू होण्याच्या काही तास आधी हिंदुस्थानच्या खेळाडूंनी मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआय व ईसीबीमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा सामना रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्याने या मालिकेचा विजेता कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

मँचेस्टर कसोटी सामना रद्द झाल्यानंतर टीम इंडिया आणि बीसीसीआयला टिकेचा सामना करावा लागला. इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉन याने तर आयपीएल आणि पैशांसाठी हा सामना रद्द करण्यात आल्याचा आरोप केला. तसेच यूएईमध्ये खेळाडूंना सहा दिवस क्वारंटाईन रहावे लागणार असल्याने पाचवी कसोटी संपल्यानंतर खेळाडूंना तेवढा वेळ मिळणार नाही यासाठी हा सामना रद्द करण्यात आल्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगली होती. ही कसोटी रद्द झाल्यापासून टीम इंडियाच्या एकाही खेळाडूने चकार शब्दही काढला नव्हता. मात्र आता शार्दुल ठाकूर याने त्या दिवशी नक्की काय घडले याचा खुलासा केला आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना शार्दुल ठाकूर याने पाचवा कसोटी सामना रद्द का करावा लागला याचा खुलासा केला आहे. तो म्हणाला, ज्यूनिअर फिजिओ योगश पारमार हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. पॉझिटिव्ह येण्याच्या आधीपर्यंत ते आमच्या संपर्कात होते. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर टीम इंडियाच्या गोटात दहशतीचे आणि भितीचे वातावरण होते. खेळाडू स्वत: आणि कुटुंबियांच्या आरोग्याच्या काळजीत होते. कोणालाही माहिती नव्हते की पुढे काय वाढून ठेवले असेल? अशा वेळी मैदानात उतरणे अशक्य होते, असेही तो म्हणाला.

T20WC मुंबई इंडियनच्या ‘या’ खेळाडूमुळं पंतचं टेन्शन वाढलं, यष्टीरक्षक म्हणून ठोकला दावा

गांगुलीचे स्पष्टीकरण

खेळाडूंनी सामना खेळण्यास नकार दिला. फिजिओ योगेश पारमार खेळाडूंच्या संपर्कात आले होते. त्यांनी खेळाडूंचा मसाजदेखील केला होता. यामुळे खेळाडूंना कोरोनाची भिती वाटत होती. अशा परिस्थितीत बायो बबलमध्ये राहणे सोपे नाही. खेळाडूंच्या भावनाचा आदर केला पाहिजे. तसेच पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा संबंध आयपीएलशी नाही. बीसीसीआय कधीही बेजबाबदार बोर्ड राहिलेला नाही, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला.

एकेकाळी ‘हा’ फलंदाज होता विराट कोहलीचा खास, रोहितमुळे लागला कारकिर्दीला ब्रेक

ईसीबीला 400 कोटींचे नुकसान

ईसीबीला पाचवी कसोटी रद्द झाल्याने प्रक्षेपणातून मिळणाऱ्या 300 कोटींचे तर तिकिट विक्रीतून होणाऱ्या 100 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

T20WC पाकिस्तानला पुन्हा पराभूत करण्यासाठी अंतिम 11 चा ‘हा’ संघ मैदानात उतरवा!

आपली प्रतिक्रिया द्या